Thursday 25 October 2018

Current Affairs || October 2018 ||

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी गीता गोपीनाथ यांची निवड


  • भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथयांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी 
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका ख्रिस्टिन लगार्डीयांनी गीता यांची निवड केली आहे.
  • सध्या मोरी ऑब्स्टफेल्ड आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाची धुरा सांभाळत आहेत.
  • मोरी डिसेंबरमध्ये निवृत्त होतील झाल्यानंतर गीता गोपीनाथ कार्यभार सांभाळणार
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती झालेल्या गीता गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत.
  • तसेच याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची या पदावर नियुक्ती झाली होती.
  • राजन 1 सप्टेंबर 2003 ते 1 जानेवारी 2007 या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी होते.

EXAM ORIENTED NOTES & MCQ || October 2018 || Current Affairs

चालू-घडामोडी EXAM ORIENTED NOTES & MCQ ||October 2018 || Current Affairs
जगाचा सर्वाधिक लांबीचा हवाई प्रवास सुरू झाला सिंगापूर ते न्यूयॉर्क दरम्यान ही विमानसेवा 19 तासांमध्ये पूर्ण होणार आहे. 16,700 किलोमीटर लांबीच्या हवाईप्रवासादरम्यान दोन वैमानिक, विशेष खाद्यपदार्थांसह प्रवाशांच्या मनोरंजनासाठी चित्रपट तसेच टीव्ही देखील उपलब्ध असणार सिंगापूर एअरलाइन्स या प्रवासाकरता एअरबस ए350-900युएलआर विमानाचा वापर करणार

Wednesday 30 December 2015

आठ सिक्रेट्स २०१६ साठी नेहमी प्रमाणे या वेळेसही नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही खास मुद्दे आपल्यासाठी सादर करत आहे व ते म्हणजे ८ सिक्रेट्स. वर्ष २०१६ चा सफर समाधानकारक आणि फलदाई बनविण्यासाठी. शिक्षण असो, नौकरी किंवा व्यवासाय प्रत्येक क्षेत्रात याची प्रेरणा आणि प्रेरणेमुळे आलेला बदल अनुभवायला मिळेल. तर मग बघुयात ८ प्रभावी सिक्रेट्स.१] अडचणींमधील अडचण म्हणजे “चालढकल”निर्णय घेण्याचे बोल्डनेस संपले कीसुरु होते ती चालढकल. बघा ना, हे करू – ते करू म्हणत २०१५ सरले. ‘एखादी ठरवलेली गोष्ट झाली नाही तर कसं होईल’ याची भीती खरं तर होणार्या परीणामांपेक्षाही भयंकर असते. २०१६मधे २०१५ पेक्षा जास्त बोल्डनेस हवेच. अहो, आपण App अपडेट करतो मग स्वतःचे गट्स का नाही. विकासाचा विसर पडला कि चालढकल वाढते आणि वर्षसरते. मग आता निवड तुमचीच. चालढकल करून आपण फक्त जोखीम टाळतो, अपयश नाही.२] तुमच्यातील ओरीजण्यालीटीच तुम्हाला टिकवेलकॉपी-पेस्ट च्या नादात आणि सो कॉल्डस्पर्धेच्या फंद्यात जो तो – ते करण्याचा प्रयत्न करतोय जे त्याचे स्वतःचे नाही. आपण सर्व वैशिष्ट्यपूर्ण आहोत, एकमेकांची कार्बन कॉपी नाही. व्यवसाय असो किंवा नौकरी – नाविन्यता, कल्पकता आणि वेगळेपण दिले तरच तुमचा क्रेझ राहणार आहे आणि हे तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा तुम्ही ओरिजिनल राहाल. कॉपी-पेस्टच्या मायाजालात शिक्षित आणि विद्वान असे गुरुफटलीत कि स्वतःचे इंस्टिंकट देखील विसरत आहेत. मार्केट डाऊन असो किंवा अप, तेजी असो का मंदी किंवा कसलेही संकटअसो फक्त एकच लक्षात असू द्या टूमॉरो नेव्हर डाइज, सो द ओरिजण्यालिटी. म्हणून २०१६ मधे cp म्हणजे कॉपी-पेस्ट नाहीत तर cp म्हणजेच क्रीएटीव्हीटी पर्सोनिफाईड वर भर द्या.३] रुटीन आणि एकरसता तोडादर वर्षी कितीतरी गोष्टी करायच्या राहून जातात आणि संकल्पांचा तर विषयच सोडा. कामा-कामात वेळच मिळत नाही, ना कोणता छंद पूर्ण होत नाही. वास्तविक पाहता आठवड्यातून एखादा दिवस रोजचे रुटीन मोडून काही वेगळे केले तर कामत फारसा काही फरक पडत नाही.पण तरीही, कामात आणि घड्याळीत गुरफटन्याची सवय जडली आहे……२०१६ मधे मात्र रुटीन ब्रेक कराच आणि द्या त्या इच्छेला वाव ज्या अपूर्ण आहेत….. माणसाला कोनतानाकोनता छंद असावा आणि त्या करता वेळ ठेवावा कारण एक छंद कित्येक आजारांचे निवारण करतो4]वर्तमानाला प्राथमिकता द्यावर्तमानालाच फोकस करणे आणि वर्तमानालाच प्राथमिकता देणे हे जास्त महत्वाचे कारण आपण जेंव्हा गेलेल्या काळाबद्दल दुख्ख आणि भविष्याबद्दल चिंता करत बसलोत तर वर्तमान हरवून बसतो. वर्तमानात कोणीच राहात नाही. वर्तमानावरच लक्ष केंद्रित केल्याने काही काळासाठी त्याला भूतकाळातील अपयश किंवा भविष्यातील आव्हानांचा, अडचणींचा विसर पडतो. या तणावविरहित परिस्थितीमुळे सकारात्मक दृष्टिकोन वाढीला लागून मनुष्याच्या कार्यक्षमतेत किंवा शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास प्रॉडक्टिव्हीटीत (उत्पादनक्षमतेत) भर पडते व हे माझ्या अभ्यास आणि संशोधनाअंती आढळून आले आहे. वर्तमानाची काळजी घेतली की भविष्यकाळ सुदृढ होतोच. २०१६ मधे प्राथमिकता वर्तमानालाच.५] तुमची कृती ठरवते प्रभाव, प्रतिबिंब आणि प्रतिफलकाही तक्रारी मी नेहमी ऐकतो – १) मला नेहमी अशेच लोक भेटतात २)जो तो माझेच नुकसान लावतो, ३] माझं नशीबच फुटकं आहे. इ. पण या सर्व प्रतिक्रिया कृतींवर आधारित आहेत आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब व त्यापासून निर्माण होणारी परिस्थिती ही तुमच्या कृतीवरूनच ठरते. वर्षांमागून वर्षेजातात, पण आपल्या वागण्या बोलण्यात फारशे बदल होत नाहीत, परिणामी आपल्या अनुभवात तेच येतं जे आधी आलेहोते. तुमची कृती मग ती वैचारिक असो किंवा शारेरिक नेहमी एक विशिष्ट तरंग निर्माण करत असते. तरंग जितके सकारात्मक तितके त्याचे रिफ्लेक्शन (परिणाम / प्रतिफळ) चांगले आणि तरंग जितके नकारात्मक तितकेच वाईट…६] पेंडिंग कामांची संख्या म्हणजेच सफलतेचा आलेखकाय म्हणता? मागच्या वर्षी बर्याच गोष्टी राहिल्या आणि खूप कामे बाकी आहेत, अहो मग तुमच्या पेंडिंग कामांची संख्याच तुमच्या सफलतेचा / असफलतेचा आलेख आहे. जर मागचीच लिस्टक्लीअर झाली नाही तर मग पुढे काय ? आता ठरवा पण ते पूर्ण करण्याच्या नियोजानानेच आणि त्या करिता बोल्ड व्हावे लागेल, जोखीम घ्यावी लागेल, रुटीन तोडावे लागेल, वर्तमानाला प्राधान्य द्यावेच लागेल आणि हो कृतीशील व्हावेच लागेल आणि हे सगळे असेल तर मागील वर्षा पेक्षा जास्त गतीने आणि तीव्रतेने करावे लागेल. काळ गतिशील आहे, आपण स्लो राहून कसं चालेल.७] वास्तविक आणि प्रायोगिकविशेष यश आणि मोठी उंची गाठायची आहेतर मग तुम्हाला भावना आणि भावुकतेच्या धुक्यातून बाहेर यावेच लागेल. ध्येय साध करायचे असतील तर आजच्या कृतींमध्ये कालचे अनुभव जोडूनच इच्छित गोष्टी मिळवाव्या लागतील. भावना नैसर्गिक आहेत, पण भावनांच्या प्रभावात वास्तविकता दुर्लक्षित होते आणि मगमनाला वाटेल त्या पद्धीतीने नाते आणि व्यवहार जोपासले जातात आणि हाती लागते ते दुक्ख आणि निराशा. दर वर्षी हेच हवे का ? आणि नको तर थोडं वास्तविक बना म्हणजेच बी प्रॅक्टिकल. कॉर्पोरेट जग खरचं निष्ठुर असतं, इथे कोणालाही तुमची दया येत नसते आणि तुमीही अपेक्षा करू नका. तुमच्या विचार आणि कृतींना वस्तुस्थितीची जोड नसेल तरहेतू किंवा प्रोजेक्ट कितीही चांगला असला तरी पदरी निराशाच येईल.२०१६ मध्ये बी मोर प्रॅक्टिकल८] रियालिटी फास्टरियालिटी फास्ट म्हणजे एक प्रकारच उपवास जो तुम्हाला उत्कृष्ठता, उन्नती आणि उंची देईल. या २०१६ मध्ये तुम्हाला इतकेच करायचं कि एक उपास धारायचाय त्यात तुम्ही सगळे खा पण, कमीत कमी २४ घंटे प्रतिक्रिया देणे टाळा, चुका दाखवणे, दोष आणि टीका करणे टाळा, पूर्वगृह करणे टाळा, कारणे देणे टाळा, नकारात्मक दृष्टीकोन टाळा, अपेक्षा करणे आणि इतरांना गृहीत धरणे टाळा….. बघा नात्यांमध्ये, नौकरी मध्ये आणि व्यवसायामध्ये कायजादू होते ते.हे खूप कठीण नाही, पण हो एक स्वतःवरील नियंत्रणाचा भाग नक्कीच आहे आणि या गोष्टी टाळल्या तार तुमची लायाकिंग प्रचंड प्रमाणात वाढेल…मित्रांनो वर्षाचा शेवट म्हणजे काही मार्च एंड ची auditing नसते जिथे आपला नफा आणि तोटा यांचा हिशोब केलाजातो. वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरवात हा एक अतूट भाग असतोजो भविष्य जोडणीला मदत करतो.

Wednesday 26 August 2015

MPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो?
जीवनात सोपं असं काही नसते. काही मिळवायचे असेल तर त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.

MPSC राज्यसेवा परीक्षा सुद्धा म्हणावी तशी सोपी नाहीये. तर मग ह्या परीक्षेत सफल व्हायला काय करावं लागणार आहे?

सर्वात प्रथम तुमच धेय्य निश्चित करा, ते पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत कोणत्या स्वरुपाची असायला पाहिजे हे मी सांगेन, ठीक आहे तर मग?

सर्वात आधी हे नक्की करा की तुम्ही जो अभ्यास करत आहे तेच तुम्हाला व्हायचं आहे का?

स्वप्न पाहण खूप सोपं आहे पण ते सिद्ध/पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत व हिम्मत लागते आणि हे खूप कठीण काम आहे.⏳ दुसरे म्हणतात म्हणून MPSC च स्वप्न पाहण चुकीच आहे, तुमचं स्वतःचा  तो निर्णय असावा लागतो.कारण त्यासाठी लागणारी मेहनत तुम्हालाच करावी  लागणार असते. तुम्ही स्वतःच निर्णय घ्या, तुमची लायकी काय आहे हे तुमच्याशिवाय कोण जाणू शकतं?

तुम्ही स्वत बघा की अश्या परीक्षेसाठी लागणारी मेहनत तुमच्या अंगी आहे का? तुमच्याजवळ तो सेल्फ-कोन्फिडेंस म्हणजेच आत्मविश्वास आहे का? सतत लागणारी दृढ इच्छाशक्ती आहे का?
जर वरीलपैकी काही नसेल तर मग असा व्यक्ती असफल्तेन व्याकूळ होतो आणि मग निराशेच्या अंधारात बुडून जातो.
पण जर तुमचा निर्णय तुमच्या मेहनती, आत्मविश्वासानं, दृढ इच्छाशक्तीन घेतलेला आहे अत्र मग निश्चिंत पुढे जा.
सुयोग्य स्टडी मटेरियल निवडा आणि अभ्यासाला लागा. तुमची एनर्जी इकडे तिकडे वाया ना घालवता अभ्यासात घाला.
राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास व्यापक/विस्तीर्ण (Wide Extensive ) व  मोजकाच (Selective Intensive) असावा. पूर्व परीक्षेसाठी विस्तीर्ण स्वरूपाचा करावा व मुख्य परीक्षेसाठी सिलेक्तीव स्वरूपाचा करावा.

पार्ट-II उद्या बघू…

       

     आपला
नागसेन सुरवाडे.

Wednesday 8 October 2014

                                                 भारतीय बैंकिंग प्रणाली

                                                 भारतीय बैंकिंग प्रणाली.

भारतीय बैंकिंग प्रणाली का इतिहास
भारत में पहला भारतीय बैंक, जनरल बैंक ऑफ इंडिया था. इसे वर्ष 1786 में स्थापित किया गया था. ईस्ट इंडिया कंपनी नें (1840ईस्वी में) बैंक आफ मुंबई, (1843ईस्वी में) बैंक आफ  मद्रास और (1809 ईस्वी में) बैंक आफ बंगाल/कोलकाता की स्थापना की थी. ये तीनो बैंक संयुक्त रूप से प्रेसीडेंसी बैंक के नाम से जाने जाते थे. इसी तरह बैंक आफ हिंदुस्तान की स्थापना वर्ष 1870 में की गयी थी. इलाहाबाद बैंक की स्थापना  वर्ष 1865 में की गयी थी. साथ ही पंजाब नेशनल बैंक लिमिटेड को 1894 ईस्वी में स्थापित किया गया था. इस बैंक का मुख्यालय लाहौर में था. 1906 और 1913 के मध्य सेंट्रल बैंक ऑफ इंडिया, बैंक ऑफ इंडिया, बैंक ऑफ बड़ौदा, इंडियन बैंक, मैसूर बैंक और केनरा बैंक स्थापित किए गए थे. वर्ष 1921 में, सभी प्रेसीडेंसी बैंकोण को विलय करके इम्पीरियल बैंक बना दिया गया जोकि यूरोपीय शेयर धारकों के द्वारा संचालित किया जाता था. इन सभी बैंको के भारतीय रिजर्व बैंक वर्ष 1935 में स्थापित किया गया था.
भारतीय बैंकों का वर्गीकरण

भारतीय बैंकों निम्नलिखित भागों में वर्गीकृत किये गए हैं:

वाणिज्यिक बैंक
• सहकारी बैंक
वाणिज्यिक बैंको के अंतर्गत शामिल हैं:
1) अनुसूचित वाणिज्यिक बैंक
अनुसूची वाणिज्यिक बैंकों में निम्नलिखित बैंक सम्मिलित हैं:
• निजी बैंक 
• सार्वजनिक बैंक 
• विदेशी बैंक 
• क्षेत्रीय ग्रामीण बैंक
2) गैर-अनुसूचित वाणिज्यिक बैंकों के अंतर्गत सम्मिलित हैं:
सहकारी बैंक
सहकारी बैंकों में शामिल हैं:
• शहरी सहकारी बैंक 
• ग्रामीण सहकारी बैंक

अनुसूचित बैंक: अनुसूचित बैंक उन बैंकों को कहते हैं जो भारतीय रिजर्व बैंक अधिनियम 1934 की दूसरी अनुसूची में शामिल हों. ध्यान रहे कि भारतीय रिजर्व बैंक सिर्फ उन्हीं बैंकों को इस सूची में शामिल करता हैं जो बैंक की धारा42(6a) में अधिनियमित मानदंडो को पूरा करते हैं.

क्षेत्रीय ग्रामीण बैंक: भारत सरकार ने 2 अक्टूबर, 1975 को क्षेत्रीय ग्रामीण बैंकों की स्थापना की थी. ये बैंक ग्रामीण क्षेत्रों में मुख्य रूप से छोटे और सीमांत किसानों और  छोटे उद्यमियों एवं खेतिहर किसानों और मजदूरों के लिए ऋण अनुदान की व्यवस्था करते हैं.  


    

Saturday 23 August 2014

Linus Torvalds : ऑपरेटींग सिस्टीम जगतामधील मवाळ क्रांतिकारक…!

Linus Torvalds : ऑपरेटींग सिस्टीम जगतामधील मवाळ क्रांतिकारक…!
लायनस टोर्व्हॅल्ड्स, असा जो याचा प्रचलीत उच्चार आहे तसा तो नाहीयं; तर लिनस तोरवाल्ड्स असा आहे. कंप्युटर म्हणजे विंडोज. म्हणजे त्यावर तेच असते, दुसरे काही असूच शकत नाही हे सर्वसामान्य युझरचे ज्ञान. थोड्याफार शिकलेल्या विद्यार्थ्यासाठी मॅक ओ.एस.सुद्धा विंडोज सारखच काहीतर प्रकरण आहे, ते ठरावीक मशीनवर चालतं आणि अमेरीकेत वापरतात इतकचं तोडक ज्ञान. हे दोनही वगळून उरले ते नवशिके प्रोग्रॅमर आणि त्यांच्या आजूबाजूला अपवाद वगळता “आठशे खिडक्या नउशे दार” या गाण्याप्रमाणे विंडोजच पहायला मिळायची. त्यामुळे इंजीनीअरींग व डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना gcc हा कमांड फक्त imported पुस्तकाच्या झेरॉक्स कॉपी मध्ये दिसायचा व प्रोग्रॅमिंग टर्बो सी मध्येच चालायचे व अजुनही चालते आहे. युनिक्स आणी लिनक्स हे डॆस्क्टॉप वर नसतात ही सुद्धा एक धारणा. त्यातुनही उरलेले ज्याना लिनक्स-युनिक्स माहीत आहे ते सर्व परदेशात. हि सर्व अवस्था फार पुर्वी नाही तर फक्त १०-१५ वर्षापुर्वीची. विंडोज ची हि मक्तेदारी खऱ्या अर्थान मोडीत काढायला सुरवात केली ती लिनसनं. आपल्याकडे अल्पसंख्यांकांच राजकारण केलं जातं पण फिनलंड मधील अल्पसंख्यांक जमातीत १९६९ साली जन्माला आलेला हा अवलीया अमेरीकेमध्ये स्थलांतरीत होउन थेट बिल गेट्स व मायक्रोसॉफ्टच्या मक्तेदारी व डिजीटल भांडवलशाही साम्राज्याला भिडला. म्हणून मी क्रांतीकारक असा शब्द वापरला…! आई व वडील दोघ सुद्धा पुरोगामी व उच्च-शिक्षीत. पण लिनस लहान असतांनाच आई-वडील वेगळे झाले व लिनस आईकडॆ वाढला. आजोबा प्रोफेसर असल्यामुळे पुढील शिक्षण सुरू झाले. सुखवस्तू असल्यामुळे ११ व्या वर्षीच घरी कंप्युटरचे आगमन झाले व बेसीक लॅंग्वेज शिकायला सुरवात केली. प्रोग्रॅमिंग व मॅथेमॅटीक्स चे जबरदस्त वेड. इतक की आजोबानी या तुन बाहेर पडावा म्हणून त्याला खेळाची सवय लावायचा प्रयत्न केला. तो प्रयोग फसला. सोशल होण्यासाठी प्रयत्न केले. ते सुद्धा फसले. शेवटचा उपाय म्हणून मैत्रीणीचा नाद लावायचा मार्ग सुद्धा अवलंबवला. पण या अवलियाने त्याला दाद दिली नाही. पैसे साठवून वयाच्या १७व्या वर्षी नवीन 128KB (MB अथवा GB नव्हे) RAM असलेले अद्यावत मशीन खरेदी केले…! १८ व्या वर्षी हेलसींकी विद्यापीठामध्ये प्रवेश घेउन लगेच C programming language च्या प्रेमात पडला व ३ वर्षाच्या कठोर परीश्रमानंतर ठरवले की ऑपरेटींग सिस्टीम लिहायची तर C language वापरायची. १९९१ साली त्याने IBM मशीन विकत घेतले. ४ MB RAM. पण यावर असलेल्या MS-DOS ला तो वैतागला होता. म्हणून युनिक्स install करायची होती कारण त्याच्या कॉलेज मध्ये युनिक्स होती. पण युनिक्स प्रचंड महाग होती. त्या काळात जवळपास ५००० डॉलर…! म्हणून ती कल्पना त्याला सोडून द्यावी लागली. व त्याने त्याच्यासारखीच पण कमी क्षमतेची टॅननबॉन ने तयार केलेल्या मिनीक्स या ऑपरेटींग सिस्टीमचा विचार केला. युनिक्स शिकवण्यासाठी टॅननबॉन मिनीक्सचा वापर करायचा. पण त्यामध्ये खुप कमतरता होत्या. म्हणून लिनस ने तीचाही नाद सोडून दिला आणी युनिक्स व मिनीक्स प्रमाणेच स्वत:च ऑपरेटींग सिस्टीम लिहीण्याचा विचार त्याचा मनात सुरू झाला. पण त्या मधील अडचणी, धोके व कॉलेजची वाया जाणारी वर्षे याची त्याला पुर्णपणे जाणीव होती. फिनलंड मध्ये त्या काळी शिक्षण मोफत असायचे व डिग्री ४ वर्षातच पुर्ण केली पाहीजे असा नियम नव्हता. म्हणून त्याने सरळ ब्रेक घेतला. मंध्यंतरी आर्मी मध्ये एक वर्षे काम करून आला कारण तिकडॆ ती अनिवार्य प्रथा होती. १९९१ च्या आसपास मात्र त्याने ऑपरेटींग सिस्टीम वर काम करायला सुरवात केली. त्यासाठी त्याने मिनीक्स वापरणाऱ्या युझर्स कडून नवीन पण फुकट देण्याची वचन देणाऱ्या ऑपरेटींग सिस्टीम पासून कोणत्या प्रकारच्या अपेक्षा आहेत हे मागवून घेतले. हे काम जिकरीचे व धाडसाचे होते. म्हणून त्याने काही काळ स्वत:ला एकट्याला कोंडून घेतले व बेसीक व्हर्जन तयार केले. अर्थातच सर्व कोड स्क्रॅच पासून लिहीण्यासाठी त्याने C language चा वापर केला. त्याला त्याने bash shell असे नाव दिले. व बेधडक पणे सर्व सोर्स कोड पब्लीक युझ साठी ftp सर्व्हर वर टाकून दिला. व प्रतिक्रीया मागवल्या. नेटवर्क वर टाकण्यासाठी त्याच्याच एका मित्राने त्याला मोलाची मदत केली.
free-soft लिनस ने या ऑपरेटींग सिस्टीम ला लिनक्स असे नाव देउन टाकायचा विचार केला. पण स्वत:च्या नावाचा आपण स्वत:च डांगोरा पिटत आहोत अशी भावना निर्माण झाल्याने त्याने नाव Freax असे ठेवले जे Free, freak आणी Minix पासून तयार केले होते. पण ज्या मित्राने ftp server वर लिनस चा सोर्स कोड टाकला होता त्या फोल्डर ला नाव लिनक्स ठेवले होते. शेवटी तेच राहीले… Richard Stallman
Richard Stallman नंतर रिचर्ड स्टॉलमन या पेशाने वकील असणाऱ्या व त्याच्या फ्री लायसेंन्स प्रमोट करणाऱ्या GPL under त्याने लिनक्स ऑपरेटींग सिस्टीम रिलीज केली. त्याने युझर्सना अभ्यास करायची, डाउनलोड करायची, मॉडीफाय करायची, एक्सटेंड करायची व प्रसार करण्याची सवलत देउन टाकली. असं फुकट काहीतरी मिळतय असे कळाल्यानंतर लोकांच्या त्यावर उड्या पडल्या तर नवल नव्हतच व लिनक्स चा प्रसार सुरू झाला. linux-20-años पाच वर्षात म्हणजे १९९७ पर्यंत ७० लाख installation झाली. अर्थातच प्रसिद्धीला शत्रू लगेच होतात तसे लिनस च्या बाबतीत सुद्धा झाले व टॅननबॉनच्या टिकेला सामोरे जावे लागले. कारण लिनक्स फ्री असल्या मुळे टॅननबॉन सैरभैर झाला. linux-vs-vista_1024x768 १९९७ मध्ये मात्र लिनस ने त्याचा मुक्काम फिनलंड मधून सिलीकॉन व्हॅलीमध्ये हालवला आणि ट्रांसमेटा या कंपनीमध्ये रुजू झाला. अर्थातच नोकरी करता करता लिनक्स वरचे काम चालू ठेवणार अशी त्याने अट घातली होती व कंपनीने ती मान्य केली. सिलीकॉन व्हॅली मध्ये अर्थातच लिनस ची तुलना थेट बिल गेट्स बरोबर सुरू झाली. दोघे सुद्धा प्रोग्रॅमर. दोघांना सुद्धा चश्मा… दोघांची उंची एकच इतकेच काय ते साम्य. एक डिजीटल क्षेत्रामधीलअनभिक्षत साम्राज्यवादी तर दुसरा फ्री देणारा गरीब नोकरदार अशी टक्कर सुरू झाली.
१९९९ मध्ये मात्र त्याच्या १५ वर्षाच्या कष्टाला फळ मिळाले व रेड हॅट ने लिनक्स डिस्ट्रिब्युट करायला सुरवात केली व लिनक्स करोडपती झाला. त्या नंतर मात्र त्याने मागे वळून पाहीले नाही कारण नंतर Oracle, Intel, Corel या दिग्गज कंपन्यानी त्यांच्या हार्डवेअर वर लिनक्स पोर्ट करायला सुरवात केली. अर्थात इतके सर्व असूनही लोकांना ती फुकटच मिळत होती व अजूनही फुकट मिळते. या सर्व घडामोडी होत असतांना, अब्जाधीश होण्याच्या अनेक संधी दारात असतांना सुद्धा लिनसने त्याच्या “आयुष्य हे आनंदाने जगण्यासाठी असते, अब्जाधीश होण्याकरीता नसते” या तत्वाला सोडले नाही. पण सध्या सुद्धा हा ४६ वर्षाचा उमदा तरूण Oregon मध्ये OSDL म्हणजेच Open Source Development Lab मध्ये काम करत असला तरी त्याला अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळण्यापासून अलिप्त ठेउ शकला नाही. त्याची लिस्टची छोटी झलकच पहा येथे IEEE चा या वर्षीचा पायोनीयर पुरस्कार, २०१२ साली इंटरनेट हॉल ऑफ फेम २०१२ मध्ये नोबेलच्या दर्जाचा मेलिनीयम टेक्नॉलॉजी पुरस्कार २००० साली टाइम मॅगेझीनचा “शतकातील १०० महत्वाच्या व्यक्तीं” च्या यादीत १७ वा क्रमांक २००२ साली पुन्हा टाइमचा जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत नाव २००६ साली गेल्या ६० वर्षातील क्रांतीकारीक हिरो…व असे अनेक पुरस्कार मिळाले. १९९६ साली तर लघुग्रह शोधणाऱ्या शास्त्रज्ञाने त्या लगुग्रहाला लिनस असे नाव दिले कारण शास्त्रज्ञच लिनक्स ऑपरेटींग सिस्टीम ने प्रभावीत झाला होता. लिनसच्या नावावर तर ३५ वेगवेगळी पेटंट्स उपलब्ध आहेत. linus-torvalds-by-glenn1794-d4xkv55-644x320 क्रॅश होणाऱ्या ऑपरेटींग सिस्टीम तयार करून अब्जाधीश व्हायचे, साम्राज्य तयार करायचे, अनेक कंपन्या घशात घालायच्या व मक्तेदारी शाबूत ठेवायची या प्रचलीत व तथाकथित न्याय्य पद्धतीला आव्हान देउन ऑपरेटींग सिस्टीम तर चांगली तयार करायचीच पण जगाच्या कल्याणाकरीता. विकायची नाही. श्रीमंत व्हायचे नाही. फुकट द्यायची. हे लिनसचे तत्व इतके प्रसिद्ध झाले की लिनस चा नियम (Linus’s Law) म्हणून मान्यता मिळाली. हा लॉ काय सांगतो की “Given enough eyeballs, all bugs are shallow”… ऑपरेटींग सिस्टीममध्ये खुप आत दडलेला बग एका प्रोग्रॅमरला सापडत नाही… पण बग सापडण्यासाठी सगळ्याना कामाला लावले तर बग शिल्लकच रहात नाही… म्हणुनच त्याने लिनक्स सर्वांसाठी फ्री उपलब्ध करून ठेवली…!
तुमच्या प्रतिक्रिया आमहाला जरूर कळवा.................................नजरचुकीने किवा डी.टी.पी करतान साह्यकाकडून चूक होऊ शकते .चुका निर्दष्ण्य्त आणून दिल्यास आपले स्वागत आहे. आपला नागसेन सुरवाडे (ब्लोग आडमिनीस्टेटर ) संदर्भ : C मराठी ब्लोग

Thursday 26 December 2013

* एमपीएससी - चालू घडामोडी *



स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या प्रिय मित्रांनो, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो परीक्षेचा दिवस
जवळ आला आहे. आपण यश मिळविण्यासाठी वर्षभर जीवापाड मेहनत केली आहे. आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा, वेळेचे अचूक नियोजन करा. कारण परीक्षेचे ते चार तासच तुमचे यश किंवा अपयश ठरविणार आहेत. परीक्षेसाठी

मनापासून शुभेच्छा !  

चालू घडामोडी हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याचा आवाकादेखील फारच मोठा आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी काही महत्त्वाचे िबदू आपणासाठी देत आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी
० भारत-बांगलादेश करार - २४ जानेवारी २०१३ रोजी भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान सुधारित व्हिसा करार आणि प्रत्यार्पण करार संमत करण्यात आला. या करारावर भारताचे गृहमंत्री सुशीलकुमार िशदे व बांगलादेशचे गृहमंत्री एन. के. आलमगीर यांनी ढाका येथे स्वाक्षऱ्या केल्या. प्रत्यार्पण करारामुळे गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही देशाच्या सुरक्षा संस्थांना मदत मिळेल. त्याचप्रमाणे सुधारित व्हिसा करारात पंचवार्षकि बहुप्रवेश व्हिसा देण्यासंबंधी तरतूद आहे. तसेच पर्यटन व्हिसा व आरोग्य चिकित्सा व्हिसा याबाबत उदार दृष्टिकोन अंगीकारण्यात आला आहे.
० ग्वादार बंदर - पाकिस्तानातील ग्वादार बंदर चीनने विकसित केले आहे. या बंदरात चीन नाविक तळ उभारत आहे. तसेच या बंदराच्या विकासामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून रोज लाखो बॅरल खनिज तेलाच्या वाहतुकीवर चीनचे अप्रत्यक्ष नियंत्रण राहू शकेल.
० मोहम्मद मोर्सी - इजिप्तचे अध्यक्ष, मोहम्मद मोर्सी यांनी प्रमाणापेक्षा जास्त अधिकार ताब्यात घेतल्याने त्यांच्या विरोधात कैरो शहरात आंदोलन करण्यात आले.
० भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचक् आणि त्यांची राणी जेत्सूम पेमा हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे होते.
० अमेरिकेतील सॅण्डी वादळानंतर फिलिपाइन्स येथे बोफा या वादळाने हाहाकार माजविला.
० फेब्रुवारी, २०१३ मध्ये अमेरिकेच्या ईशान्य भागात नेमो या बर्फयुक्त चक्रिवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
० महेंद्रसिंग धोनी यास नेपाळ क्रिकेटचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
० अ‍ॅटलास-५ या प्रक्षेपकाच्या मदतीने, अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्राने ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील केंद्रातून मंगळ ग्रहाच्या अध्ययनासाठी, 'मार्स सायन्स लॅबोरेटरी' ही यांत्रिक बग्गी जिचे नाव क्युरिओसिटी हे आहे, ही प्रक्षेपित केली.
० ऑगस्ट, २०१२ मध्ये अमेरिकन उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीने आंतरराष्ट्रीय सायकलिंग क्षेत्रातील दिग्गज खेळाडू लान्स आर्मस्ट्राँग याच्यावर आजन्म बंदी घातली असून, त्याची सर्व अजिंक्यपदे काढून घेण्याचाही निर्णय घेतला आहे.
० मार्च २०१३ मध्ये बांगलादेशातील ढाका विद्यापीठाने प्रणव मुखर्जी यांना मानद डॉक्टरेट बहाल केली.
० 'अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस् अ‍ॅण्ड सायन्स' या अमेरिकन संस्थेद्वारे प्रतिवर्षी देण्यात येणारा ऑस्कर पुरस्कार चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. २४ फेब्रुवारी २०१३ रोजी लॉस एंजिलिस येथे ८५वा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून बेन अप्लेक यांनी दिग्दíशत केलेला 'आर्गो' या चित्रपटास ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला. २०१२ मध्ये ८४वा ऑस्कर पुरस्कार 'द आर्टस्टि' या चित्रपटाला मिळाला होता. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून 'िलकन' या चित्रपटात िलकन याची भूमिका साकारणारा आयरिश अभिनेता डॅनिअल लुईस याला पुरस्कार प्राप्त झाला. 'लाइफ ऑफ पाय' या चित्रपटाला सर्वाधिक चार ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
० 'इट इज नॉट अबाऊट द बाइक  माय जर्नी बॅक टू लाइफ' हे आत्मचरित्र लान्स आर्मस्ट्राँगचे असून त्याने १९९९ ते २००५ या काळात 'टूर दी फ्रान्स' ही शर्यत सतत सात वेळा जिंकली होती. मात्र डोिपग प्रकरणी अमेरिकन उत्तेजक प्रतिबंधक समितीने त्याची सर्व पदके काढून घेतली.
० जानेवारी २०१३ मध्ये कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे भारतीय विज्ञान परिषदेचे शंभरावे अधिवेशन पार पडले. या परिषदेत भारताचे चौथे राष्ट्रीय विज्ञान धोरण घोषित करण्यात आले. 'सायन्स फॉर शेिपग दी फ्युचर ऑफ इंडिया' ही या परिषदेची मध्यवर्ती कल्पना होती.
० ११वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन, २०१३ - ७ ते ९ जानेवारी २०१३ या दरम्यान कोची (केरळ) येथे ११व्या प्रवासी भारतीय दिवस, संमेलनाचे उद्घाटन डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. यासाठी प्रमुख अतिथी मॉरिशसचे राष्ट्रपती राजकेश्वर पुरियाग हे होते. 'एंगेजिंग डायस्पोरा : द इंडियन ग्रोथ स्टोरी' ही या कार्यक्रमाची थीम होती. १०वे संमेलन २०१२ मध्ये जयपूर येथे भरले होते.
० अलिप्त राष्ट्र संघटनेची १६वी शिखर परिषद १६ ते ३१ ऑगस्ट २०१२ या कालावधीत तेहरान (इराण) येथे पार पडली. या परिषदेत मावळते अध्यक्ष मोहम्मद मोर्सी (इजिप्त) यांनी इराणचे राष्ट्रपती मोहम्मद अहमदिनेजाद यांच्याकडे अध्यक्षपदाचा कारभार सुपूर्द केला. सतरावी (१७वी) शिखर परिषद २०१५ मध्ये व्हेनेझुएला येथे होणार आहे.
० ब्रिक्स शिखर परिषद, २०१२ - २९ मार्च २०१२ रोजी ब्रिक्स राष्ट्रसमुहांची चौथी शिखर परिषद नवी दिल्ली येथे पार पडली. ब्रिक्सचे सदस्य राष्ट्र - ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे आहेत.
० जी-२० शिखर परिषद - १८ ते २० जून २०१२ दरम्यान लॉस काबोस (मेक्सिको) येथे जी-२० संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांची सातवी शिखर परिषद पार पडली. या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले.
० सेऊल अणुसुरक्षा परिषद २०१२ - मार्च २०१२ मध्ये सेऊल (दक्षिण कोरिया) येथे जागतिक स्तरावरील दुसरी अणुसुरक्षा परिषद पार पडली. २०१४ मध्ये तिसरी अणुसुरक्षा परिषद नेदरलँड येथे होणे नियोजित आहे.
० १९ एप्रिल २०१२ रोजी दक्षिण सुदान हा जागतिक बँकेचा तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा १८८ वा सदस्य देश ठरला.
० २० जुल १९६९ रोजी चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे अमेरिकी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांचे २५ ऑगस्ट रोजी वयाच्या ८२व्या वर्षी अमेरिकेत सिनसिनाटी येथे निधन झाले. अपोलो-११ या यानातून त्यांनी प्रवास केला होता.
० अमेरिकेत तयार करण्यात आलेला 'टायटन' हा महासंगणक जगातील सर्वाधिक वेगवान संगणक ठरला आहे.
० स्वित्र्झलडस्थित 'युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लिअर रिसर्च' (सर्न) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ४ जुल, २०१२ रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात 'लार्ज हैड्रॉन कोलायडर' या यंत्राच्या मदतीने करण्यात आलेल्या प्रयोगातून 'हिग्ज-बोसॉन'सारखे गुणधर्म दर्शविणारा नवा कण सापडल्याचे घोषित केले. या कणाला वैज्ञानिक पिटर हिग्ज आणि भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावावरून हिग्ज-बोसॉन हे नाव देण्यात आले. त्याच्या गुणधर्मामुळे त्याला गॉड पार्टकिल म्हणूनही संबोधले जाते.
० ऑस्ट्रेलियातील न्यु साऊथ वेल्स युनिव्‍‌र्हसिटी, सिडनी येथे महात्मा गांधीजींचा पुतळा बसविण्यात आला आहे.
० अमेरिकेचे अफगाणिस्तान व पाकिस्तानसाठी विशेष दूत म्हणून मार्क ग्रोजमन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
० संयुक्त राष्ट्रसंघाने २०१०-२०२० हे दशक जैविक बहुविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे.
० पोर्तुगालमध्ये जवळजवळ ७५ हजार भारतीय लोक काम करतात. दोन्ही देशांतील संबंध अधिक वृिद्धगत व्हावेत, या दृष्टीने भारत व पोर्तुगाल दरम्यान सामाजिक सुरक्षा करार र्रूं' रीू४१्र३८ अॠ१ीेील्ल३ (ररअ) झाला. भारताने आतापर्यंत १७ देशांबरोबर असा करार केला आहे.
० आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा प्रकल्प जोधपूर (राजस्थान) येथे वेलस्पून (ही'२स्र्४ल्ल एल्ली१ॠ८ छ३.ि) ने विकसित केला. त्याची क्षमता ५० मेगाव्ॉट इतकी आहे.
० जगातील सर्वात मोठा बायोगॅस प्रकल्प फिनलँडच्या पश्चिम किनाऱ्याजवळ विकसित करण्यात आला आहे. त्याची क्षमता १४० मेगाव्ॉट इतकी आहे.
० २०१२ सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार युरोपियन युनियनला तर साहित्याचा पुरस्कार चीनच्या मो यांग यांना प्राप्त झाला.
० २०१२ चा अर्थशास्त्राचा पुरस्कार अमेरिकेच्या अल्विन रॉय, अमेरिकेच्या लॉइड शिपले यांना प्राप्त झाला.
० २०१२ चा रसायनशास्त्राचा पुरस्कार शरीराबाहेरील सिग्नल स्वीकारणाऱ्या आणि त्याला प्रतिसाद देणाऱ्या शरीरातील पेशींमधील 'जी प्रोटीन'च्या संशोधनाबद्दल अमेरिकेच्या रॉबर्ट लेफ्कोवित्झ व ब्रायन कोबिल्का यांना प्राप्त झाले.
० २०१२ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार पुंजभौतिकी (क्वान्टम फिजिक्स) मधील संशोधनाबद्दल सर्ज हारोश (फ्रान्स) व डेव्हिड वाइनलँड (अमेरिका) यांना हा पुरस्कार देण्यात आला. या संशोधनातील निष्कर्षांंच्या मदतीने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानातून आणखी वेगवान आणि शक्तिशाली क्वान्टम कम्प्युटर विकसित करणे शक्य होणार आहे.
० वैद्यकशास्त्रातील २०१२ चा पुरस्कार स्टेम सेल्सच्या संशोधनाबद्दल म्हणजे पूर्ण वाढ झालेल्या पेशींमधील जैविक माहिती पुसून टाकून त्या जागी नवी माहिती टाकून पूर्ण वाढ झालेली पेशी तयार करता येते या संशोधनाबद्दल ब्रिटनच्या जॉन गुरडॉन व जपाच्या शिन्या यामानाका यांना प्राप्त झाला.
० भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (उअ‍ॅ) विनोद रॉय यांची आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (कअएअ) व विश्व बौद्धिक संपदा (हकढड) यांच्या बाह्य़लेखा परीक्षक म्हणून नियुक्ती.
० युनोचे महासचिव बान-की-मून यांची कारकीर्द ३१ डिसेंबर २०११ रोजी संपली. मात्र पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे २०१२ ते २०१६या काळासाठी त्यांचीच बिनविरोध फेरनिवड झाली आहे. युनोचे महासचिव बान-की-मून यांनी भारतीय उच्चायुक्त अतुल खरे यांची युनोच्या शांतता मोहिमेच्या उपमहासचिवपदी नियुक्ती केली आहे.
० वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन ३ ते १४ डिसेंबर २०१२ या काळात दुबई येथे भरले.
० अमेरिकेच्या कॅलिफोíनया या राज्याने भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास मान्यता दिली.
० २०१२ ची मिस युनिव्हर्स स्पर्धा डिसेंबर २०१२ मध्ये लासवेगास (अमेरिका) येथे पार पडली. २०१२ च्या ६१व्या स्पध्रेत मिस युनिव्हर्स हा किताब अमेरिकेच्या ऑलिव्हिया कल्पो यांना मिळाला. १९९४ मध्ये भारताच्या सुश्मिता सेन व २००० मध्ये लारा दत्त यांना मिस युनिव्हर्स हा किताब मिळाला होता.
० ६२वी मिस वर्ल्ड स्पर्धा १८ ऑगस्ट २०१२ रोजी ओरदोस (चीन) येथे संपन्न झाली. या स्पध्रेत २०१२ च्या मिस वर्ल्ड हा किताब चीनच्या वेन झिया यु यांना मिळाला. आतापर्यंत भारताच्या एकूण पाच सौंदर्यवती मिस वर्ल्ड किताबाच्या मानकरी ठरल्या आहेत. १९६६ मध्ये रीटा फारिया, १९९४ मध्ये ऐश्वर्या रॉय, १९९७ मध्ये डायना हेडन, १९९९ मध्ये युक्ता मुखी, २००० मध्ये प्रियांका चोप्रा.
० समाजोपयोगी सामाजिक क्षेत्रात केलेल्या असाधारण कामगिरीसाठी फिलिपाइन्स सरकारमार्फत 'रॅमन मॅगसेसे' हा पुरस्कार दिला जातो. यालाच 'आशियाचे नोबेल' म्हणूनही संबोधले जाते. आचार्य विनोबा भावे यांना १९५८ मध्ये हा पुरस्कार प्राप्त झाला होता. ग्रामीण भारतातील महिला व त्यांच्या कुटुंबाचे आíथक जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करणाऱ्या कुलंदी फ्रान्सिस (तामिळनाडू) यांना २०१२ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला.
० शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास यासंबंधी आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुमोल योगदानासाठी, इंदिरा गांधी मेमोरिअल ट्रस्टतर्फे देण्यात येणारा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार २०१२ या सालासाठी लायबेरियाच्या अध्यक्षा एलिन जॉन्सन सरलिक यांना प्राप्त झाला.
० राष्ट्रकुल संघटनेतील देशांतर्गत इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी ग्रेट ब्रिटन शासनामार्फत देण्यात येणारा व अतिशय प्रतिष्ठेचा मॅन बुकर पुरस्कार २०१२ सालचा 'िब्रग अप दी बॉडीज' या साहित्यकृतीसाठी हिलरी मॅटल यांना प्राप्त झाला.
० न्या. उषा मेहरा आयोग - स्त्रियांची विशेषत: दिल्लीतील स्त्रियांची सुरक्षितता व संरक्षण याबाबत योजावयाच्या उपायययोजनांसंदर्भात डिसेंबर २०१२ मध्ये या आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती. या आयोगाने फेब्रुवारी २०१३ मध्ये केंद्र सरकारला आपला अहवाल सादर केला.
० राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम - महाराष्ट्र शासनाने २००८ साली सुरु केलेला बाल आरोग्य तपासणी कार्यक्रम केंद्र शासनाने 'राष्ट्रीय बाल आरोग्य अभियान' म्हणून स्वीकारला आहे. ६ फेब्रुवारी २०१२ रोजी पालघर (ठाणे) येथून या कार्यक्रमास सुरुवात झाली. सहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आरोग्यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला असून त्यासाठी शाळा, अंगणवाडय़ा आदींशी आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे जोडण्यात येणार आहे. आदिवासी खेडीपाडी तसेच वाडय़ा-वस्त्यांपर्यंत या मोहिमेचा लाभ पोहचवला जाणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ देशातील २७ कोटी बालकांना होणार आहे.
० सहकार चळवळ अधिक पारदर्शक व्हावी यासाठी केंद्र सरकारने ९७वी घटनादुरुस्ती दिनांक १३ जानेवारी २०१२ रोजी जाहीर केली आहे. यानुसार देशातील सर्व राज्यांना व सहकारी संस्थांना दिनांक १५ फेब्रुवारी २०१३ पासून सहकार कायद्यात योग्य तो बदल करून त्यांची अंमलबजावणी करणे बंधनकारक केले आहे. यातील महत्त्वपूर्ण तरतुदी म्हणजे संचालक मंडळाची सदस्यसंख्या २१ पेक्षा जास्त नसावी, २१ संचालकांखेरीज दोन तज्ज्ञ संचालक स्वीकृत करता येतील. मात्र त्यांना पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. संचालकांच्या जागा रिक्त झाल्यास व निवडणुकींना अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी असेल. तेवढय़ा जागा निवडणुकीच्या माध्यमातून भरण्याची तरतूद आहे, मात्र महाराष्ट्रात शासनाने या जागा निवडणुकीऐवजी तेवढे सदस्य स्वीकृत केले जाणार असा निर्णय घेतला आहे. सहकार संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या धर्तीवर राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद.
० गोवा राज्य शासनाने राज्यातील स्त्री-भ्रूण हत्या रोखण्याच्या उद्देशाने 'लाडली लक्ष्मी' ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आखली असून त्या अंतर्गत १८ वष्रे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलीच्या विवाहासाठी एक लाख रुपयांचा निधी देण्याची तरतूद आहे.
० केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने २०४५ पर्यंत लोकसंख्या स्थिर करण्याचे ठरविलेले उद्दिष्ट आता २०७० पर्यंत वाढविले आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० मध्ये लोकसंख्या स्थिरिकरणाचे उद्दिष्ट २०४५ पर्यंत ठरविले होते. परंतु, जनन दर अद्यापही २.८% ने चालू असल्याने हे उद्दिष्ट २०७० पर्यंत वाढविण्यात आले आहे.
० हरियाणा सरकारने लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी 'समाधान' ही वेब पोर्टल आधारित प्रणाली सुरू केली आहे. अशा प्रकारे आपल्या तक्रारी ऑनलाइन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे हे पहिले राज्य ठरले आहे.
० ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे हिशोबाचे काम आता ऑनलाइन सुरू होणार असून त्यासाठी केंद्र सरकारने 'प्रिया' पंचायतराज इन्स्टिटय़ूशन अकाऊंटस् या सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे.
० मध्यप्रदेश शासनाने राज्यातील ग्रामपंचायतींना अधिक बळकट करण्यासाठी दिनांक १ जानेवारी २०१२ पासून 'पंच परमेश्वर' योजना कार्यान्वित केली आहे.
० २०१२ मध्ये आसाम या राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे काझिरंगा या राष्ट्रीय उद्यानातील अनेक प्राण्यांचा बळी गेला.
० ग्रामीण विकास मंत्रालय आणि पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने देशात स्वच्छता आणि निर्मलता यांच्या प्रति जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विद्या बालन हिला आपली ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.
० ३ फेब्रुवारी, २०१३ रोजी हवाई दलात वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी 'पीसी-७ व एमके-२' ही विमाने हैद्राबादजवळील डूंडिगल येथील हवाई दलाच्या अकादमीत दाखल झाली आहेत. स्वित्र्झलडमधील विलाटस एअरक्राफ्ट कंपनीने ती तयार केली आहेत.
० ८ मार्च २०१३ रोजी दिल्ली येथे देशातील पहिले महिला टपाल कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयात महिला कर्मचारी असतील.
० केंद्र शासनाने ७ जून २०१२ रोजी संपूर्ण स्वच्छता अभियानाचे नामकरण 'निर्मल भारत अभियान' असे केले आहे. याशिवाय केरकचऱ्याचे व्यवस्थापन व विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक गावाला एकरकमी किमान सात लाख व कमाल २० लाख रुपयांची वित्तीय मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ग्रामीण भागात शौचालयाच्या निर्मितीसाठी १० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
० अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी २०१० मध्ये भारत सरकारने इटलीच्या 'फिनमेकानिका' या कंपनीची उपकंपनी असलेल्या 'ऑगस्टा वेस्टलँड' या कंपनीसोबत ३,६०० कोटी रुपयांचा सौदा केला होता. या कराराअंतर्गत भारतास १२ 'एडब्ल्यू-१०१' हेलिकॉप्टर मिळणार होती. इटलीच्या तपास संस्थांच्या अहवालात या खरेदी व्यवहारात माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांना त्यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून लाच देण्यात आल्याचा आरोप आहे.
० भारतातील पहिले मेगा फूड पार्क चित्तुर, आंध्रप्रदेश येथे स्थापन करण्यात आले आहे. त्यास 'श्रीनी मेगा फूड पार्क' असे संबोधले जाते.
० केंद्रीय जलसंसाधान मंत्रालयाच्या वतीने १० -१४ एप्रिल २०१२ या कालावधीत नवी दिल्ली येथे पहिला भारतीय जलसप्ताह साजरा करण्यात आला. या जल कार्यशाळेची संकल्पना 'पाणी, ऊर्जा आणि अन्नसुरक्षा : उपाय' अशी आहे.
० २५ फेब्रुवारी २०१३ रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पीएसएलव्ही-सी २० या प्रक्षेपकाद्वारे एकाच वेळी सात उपग्रह श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले आहेत. पीएसएलव्ही या उपग्रह प्रक्षेपकाची ही सलग २२वी यशस्वी मोहीम ठरली. या मोहिमेत भारत आणि फ्रान्स यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी अभ्यासासाठी तयार करण्यात आलेला सरल (रअफअछ) या उपग्रहासह अन्य सहा परकीय उपग्रह यांचा समावेश आहे. सरल या उपग्रहाचा उपयोग सागरी हवामान अभ्यास, सागरी हवामान अंदाज, वातावरण निरीक्षण, पर्यावरण निरीक्षण, जैवविविधता संरक्षण, सागरी सुरक्षेत होणार आहे.
नवे विज्ञान तंत्रज्ञान धोरण
देशाचे चौथे विज्ञान तंत्रज्ञान धोरण २६ डिसेंबर २०१२ रोजी मंजूर करण्यात आले. हे धोरण १ जानेवारी २०१३ पासून लागू करण्यात आले. 'विज्ञानासाठी माणूस आणि माणसासाठी विज्ञान' हे या धोरणाचे ध्येय आहे. 'संशोधन आणि विकास' यांच्यावरील खर्चात वाढ करून तो स्थुल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) २ टक्क्यांपर्यंत नेणे. तसेच 'स्मॉल आयडिया, स्मॉल मनी' व रिस्की आयडिया फंड या दोन योजनांद्वारे नव्या शोधांना पाठबळ देणे हे या धोरणाचे प्रमुख वैशिष्टय़े आहेत.
० फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार फेब्रुवारी २०१३ मध्ये प्रसिद्ध अर्थशस्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांना घोषित झाला. हा पुरस्कार 'कमांडर डी लॉ लॉजियन डी ऑनर' हा आहे.
० १५व्या मराठा लाइट इन्फ्रंट्रीचे लेफ्टनंट नवदीपसिंग यांना मरणोत्तर 'अशोकचक्र' या शांततेच्या काळातील सर्वोच्च शौर्य पुरस्काराने २६ जानेवारी २०१२ रोजी सन्मानित करण्यात आले.
० 'संरक्षण संशोधन आणि विकास' संस्थेने (ऊफऊड ने) निर्मित केलेले, 'अ‍ॅडव्हान्स एअर डिफेन्स ०५' (एएडी-०५) या इंटरसेटवर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी चंडिपूर (ओडिशा) येथे १० फेब्रुवारी २०१२ रोजी करण्यात आली. हे क्षेपणास्त्र संपूर्ण देशी बनावटीचे असून ते शत्रूचे क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत नष्ट करू शकते.
० 'लक्ष्य' हे वैमानिकविरहित विमान असून २७ जानेवारी २०१२ रोजी 'लक्ष-२' या विमानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
० इस्त्रोची शंभरावी अंतराळ मोहीम - ९ सप्टेंबर २०१२ रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पीएसएलव्ही सी-२१ द्वारे फ्रान्सचा 'स्पॉट-६' व जपानचा 'प्रोइटर्स' हे उपग्रह अवकाशात सोडले आहेत.
० २३ डिसेंबर २०१२ रोजी सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सर्वाधिक एकदिवसीय सामने ४६३ हे खेळले असून, त्यात त्याने ४९ शतके व ९६ अर्धशतके झळकावली आहेत. बांगलादेशमध्ये झालेल्या आशियाई चषक स्पध्रेत १८ मार्च २०१२ रोजी पाकिस्तानवरुद्ध त्याने अखेरचा सामना खेळला.    ० अर्जेटिनाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी याने सलग चौथ्यांदा आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेचा (फिफा) सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू हा पुरस्कार सलग चार वेळा पटकावला.
० पाचवी ट्वेंटी-ट्वेन्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०१४ मध्ये बांगलादेश येथे नियोजित आहे. तसेच विसावी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा २०१४ मध्ये ब्राझिल येथे नियोजित आहे.
० २०१३ च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेतील महिला  एकेरी विजेती बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेन्का असून, पुरुष एकेरीचा विजेता सर्बयिाचा नोवाक जोकोविच आहे.
० ऑगस्ट २०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या विश्वचषक युवा क्रिकेट स्पध्रेचे अजिंक्यपद भारताने पटकाविले. भारतीय युवा संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद हा होता. या स्पध्रेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार विल्यम बॉसिस्टो हा मालिकावीर ठरला व ऑस्ट्रेलिया उपविजेता संघ होता.
० ३१ जानेवारी ते १७फेब्रुवारी २०१३ या दरम्यान महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा मुंबई आणि कटक येथे पार पडली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर विजय मिळवून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. या स्पध्रेत आठ देशांनी भाग घेतला होता. भारताला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
० २८ जानेवारी २०१३ रोजी अंतिम सामन्यात मुंबई संघाने कर्णधार अजित आगरकर याच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्राचा पराभव करून रणजी करंडक स्पर्धा ४० व्या वेळी जिंकली.
० इंडियन प्रीमिअर लीग (आय.पी.एल.) च्या सहाव्या हंगामासाठी झालेल्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल हा ठरला. मुंबई इंडियन्सने त्याला ५.३ कोटी रुपयांत विकत घेतले.
० इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर 'हॉकी इंडिया लीग' ही स्पर्धा १४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१३ दरम्यान भारतात पार पडली. रांची ऱ्हायनोज व दिल्ली वेव रायडर्स यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत रांची ऱ्हायनोज संघाने बाजी मारून हॉकी इंडिया लीगच्या पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकाविले.
० २०१२ मध्ये झालेल्या एकविसाव्या सुलतान अझलनशहा चषक हॉकी स्पध्रेचा विजेता न्युझीलंडचा संघ असून या स्पध्रेत भारतास तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
० २०१२ मध्ये भरलेली इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा ही पाचवी स्पर्धा होती. यात कोलकाता नाईट रायडर्स हा विजेता संघ होता तर चेन्नई सुपर किंग्ज हा उपविजेता संघ ठरला. या स्पध्रेत कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू सुनील नारायण यास सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार तर या स्पध्रेत सर्वाधिक धावांची ऑरेंज कॅप रॉयल चॅलेंजर्स, बंगळुरुचा ख्रिस गेल याला मिळाला.
० एम. थिरुष कामिनी ही आयसीसी महिला विश्वचषक स्पध्रेत (२०१३) शतक साकार करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली.
० १९८५-८६ साली सुरू झालेल्या इंदिरा आवास योजनेच्या अनुदानात १ एप्रिल २०१३ पासून वाढ करण्यात आली आहे. केंद्राकडून देण्यात येणारे हे अनुदान ४५ हजारांवरून आता ७५ हजारांपर्यंत वाढविण्यात आले आहे. डोंगरी व नक्षलग्रस्त भागातील लोकांना हे अनुदान ४७.५०० वरून ८० हजारांपर्यंत वाढविण्यात आले आहे.
० 'आपका पसा आपके हाथ' ही केंद्र सरकारची योजना लाभार्थ्यांना अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याची योजना आहे. या योजनेची सुरुवात १ जानेवारी २०१३ पासून करण्यात आली.
० 'लेक सोनियाची' योजना - दारिद्य्ररेषेखालील मुलींना विशेष आíथक लाभ देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्ट २०१२ पासून ही योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत दारिद्रयरेषेखालील प्रत्येक मुलीच्या नावावर २१,२०० रुपये जमा करण्यात येणार असून मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला एक लाख रुपये देण्यात येतील.
० घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरवर देण्यात येणारे अनुदान आता ६ ऐवजी ९ सिलेंडरवर देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. ही सुविधा पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांनाच मिळणार आहे.
० १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील  सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर, बलात्कार व शारीरिक शोषणाविरोधातील कायदे कडक करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश जे. के. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीत माजी मुख्य न्यायाधीश लीला सेठ व माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम् यांचादेखील समावेश होता. या समितीने आपला अहवाल २३ जानेवारी २०१३ रोजी केंद्र सरकारला सादर केला.

Sunday 15 December 2013

जैवतंत्रज्ञानातील नवी शाखा




भारतात माहिती-तंत्रज्ञानाने काय क्रांती घडवली हे आपल्याला माहित आहेच. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या मंदीचा परिणाम होऊनही या क्षेत्राने गेल्या वर्षी ८७ अब्ज डॉलर्सची उलाढाल नोंेदवली. हा पैसा रुपयांत चार लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. एवढी उलाढाल करणार्‍या या धंद्यात अजूनही भरपूर संधी आहेच. पण या व्यवसायाला ङ्गुटलेल्या वाटाही आपल्याला व्यवसायसंधी म्हणून उपयोगी पडणार्‍या आहेत. ही शाखा म्हणजे बायो इन्ङ्गर्मेटिक्स. ही नवी शाखा अजूनही अनेक पदवीधरांना नीट समजलेली नाही. माहिती-तंत्रज्ञान सर्वांना माहीत आहे आणि हळूहळू जैव तंत्रज्ञान माहीत होत आहे. बायोइन्ङ्गर्मेटिक्स ही या जैव तंत्रज्ञानाचीच शाखा आहे. या पुढच्या काळात जैवतंत्रज्ञानाला ङ्गार महत्त्व येणार आहे. कारण या तंत्रज्ञानातूनच शेतीत वापरले जाणारे बियाणे तयार केले जात आहे. संकरित बियाणांनी आपल्या शेतीत क्रांती केली आहे. पण आता जैवतंत्रज्ञानावर आधारलेली क्रांती ङ्गार व्यापक आणि शेती व्यवसायाचे स्वरूप पार बदलून टाकणारी ठरणार आहे. याच तंत्रज्ञानाने औषधी व्यवसायही असाच बदलून जाणार आहे. या बदलांना जनुक अभियांत्रिकी ही या तंत्रज्ञानाची शाखा कारणीभूत आहे. या शाखेत प्राणी आणि वनस्पती यांच्या जनुकांचा आणि त्यांच्या पेशींचा किचकट अभ्यास केला जात असतो. हा अभ्यास करताना ङ्गारच गुंतागुंतीची गणिते करावी लागतात. ती गणिते करण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाच्या ज्या शाखेचा उपयोग होतो ती म्हणजे बायोइन्ङ्गर्मेटिक्स. या शाखेच्या विस्ताराचा अजून प्रारंभही झालेला नाही. पण येत्या पाच-दहा वर्षात बायोटेक्नालॉजी, जेनेटिकल इंजिनियरिंग, बायो इन्ङ्गर्मेटिक्स या शास्त्रांचे महत्त्वही वाढणार आहे. त्यांच्यावर आधारलेल्या प्रयोगशाळा आणि उद्योग यांत मोठी गुंतवणूक होऊन हजारो नोकर्‍या निर्माण होणार आहेत. त्या नोकर्‍या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नोकर्‍यांप्र ाणे भारी पगाराच्या असतील. तेव्हा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात शिरकाव करण्यास आवश्यक त्या गुणवत्तेच्या तरुणांनी आतापासूनच बायोइन्ङ्गर्मेटिक्स या क्षेत्रात शिरकाव करावा. या क्षेत्रातल्या पदव्या घेतलेल्या तरुणांना सिक्वेन्सिंग असेंब्लींग, सिक्वेन्सिंग जीन अनॅलिसिस, प्रोटिओमिक्स, र्ङ्गॉेकोजीनोमिक्स अशा विविध कामांत मोठी मागणी आहे. विज्ञान, औषधशास्त्र (ङ्गार्मासिस्ट), अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान या शाखांच्या पदवीधरांना बायोइन्ङ्गर्मेटिक्सच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. पुणे विद्यापीठात बायो इन्ङ्गर्मेटिक्सचा अभ्यासक्रम सुरू आहे. त्याशिवाय बंगळूर येथे इन्स्टिट्यूट ऑङ्ग बायोइन्ङ्गर्मेटिक्स अँड अप्लाईड बायोटेक्नॉलॉजी (आयबीएबी) या संस्थेत हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.या व्यतिरिक्त हे प्रशिक्षण देणार्‍या संस्था अशा आहेत – बायो इन्ङ्गर्मेटिक्स इंस्टीट्यूट ऑङ्ग इंडिया, नोईडा, इंडियन इन्स्टिटयूट ऑङ्ग टेक्नालॉजी (आयआयटी) दिल्ली आणि युनिव्हर्सिटी ऑङ्ग हैदराबाद. या क्षेत्रात पदार्पण करणार्‍या पदवीधरांना सुरूवातीला चांगले दरमहा असे वेतन मिळते. पुढे ते चांगले वाढू शकते.

आपलं मत आमच्या पर्यंत पोहोचवा.


 

Friday 6 December 2013

  मित्रानो आपल्याला आज सर्व युवा पिढी ज्या समस्येला तोंड देते आहे ती म्हणजे बेरोजगारी...

शिक्षण घेहूनही, अंगी सर्व गुण असतानाही योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे व माहितीचा अभाव

असल्यामुळे अनेकजन या बेरोजगारीचा आगीत होरपळून निघतात.

मित्रानो योग्य मार्गदर्शन, मेहनत करण्याची तयारी ,योग्य दिशा असेल तर आपण कुठलेही यश प्राप्त करून शकतो.महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तर्फे दरवर्षी विविध पदासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या परीक्षांची तयारी जर आपण योग्य दिशेने केली तर यश आपलेच आहे.गरज आहे योग्य मार्गदर्शन, मेहनत करण्याची तयारी ,योग्य दिशा घेयून यशासाठी करायच्या प्रवासाची. आणि आपल्या या यश प्राप्त करायचा प्रवासाकरिता माझ्या शूभेच्या.

MPSC बद्दल सर्व काही.... या पानावर आपल्याला MPSC बद्दल संपूर्ण माहिती पुरवली जाईल.

 

Wednesday 20 November 2013















रहिवासाचा विशिष्ट असा ओळख क्रमांक असावा या उद्देशाने आधार ही योजना सुरू करण्यात आली असून संपूर्ण देशामध्ये या ओळखक्रमांकामुळे प्रत्येक नागरिकास ओळखले जाईल असे `आधार` प्रकल्पाचे क्षेत्रिय उपमहासंचालक डॉ.अजय भूषण पांडे यांनी महान्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
प्रश्न : `आधार` क्रमांक म्हणजे काय ?
उत्तर : आपल्या भारतामध्ये जे रहिवाशी आहेत त्यांना रहिवासाचा विशिष्ट असा ओळख क्रमांक असावा, ही त्यामागची संकल्पना आहे. जेव्हा एखाद्या माणसाला रेशन कार्ड पाहिजे असते तेव्हा त्याला पुरावा द्यावा लागतो. ओळखीचे प्रमाणपत्र द्यावे लागते. आपण शहरातील लोक पॅनकार्ड, पारपत्र, ओळखपत्र, स्वत:च्या ओळखीसाठी देतो. परंतु गावातील लोकांकडे ही कागदपत्रे नसतात. त्यामुळे त्यांना हे फायदे घेतांना फार त्रास होतो. इलेक्ट्रीक बिल घेतांना रेशनकार्डाचा पुरावा तर रेशनकार्ड घेतांना दुसरा एखादा पुरावा मागतात. एका पुराव्यासाठी दुसरा, तर दुसर्‍या पुराव्यासाठी तिसरा याप्रमाणे पुरावे द्यावे लागतात. त्यामुळे देशातील सामान्य लोकांचे हाल होतात. हे खर्चिक आहे. आधी वयाचा पुरावा, बँकेत खाते उघडताना पुरावा लागतो. हे सर्व टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांकडे एक ओळखक्रमांक असावा ज्यामुळे त्यांना संपूर्ण देशामध्ये त्या ओळखक्रमांकामुळे ओळखले जाईल अशी योजना आहे. अभिमानाची गोष्ट आहे की, संपूर्ण जगामध्ये या मोठय़ा प्रकारची योजना मोठय़ा प्रमाणात राबविण्यात आली आहे. म्हणजे एक `क्रांतीकारक पाऊल` म्हणावे लागेल. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत लोक, झोपडपट्टीत राहणारे लोक, कुठल्याही प्रकारचे पुरावे नसलेल्या लोकांना ही योजना अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
प्रश्न : नोंदणी कशी करावी, प्रक्रीया काय आहे?
उत्तर : प्रत्येक गावात, प्रत्येक शहरी भागात ठिकठिकाणी घरोघरी जाऊन लोकांची माहिती म्हणजे नाव, गाव, पत्ता गोळा करण्यात येणार आहे. याशिवाय इतर माहिती म्हणजे रेशनकार्ड व इतर कागदपत्रे याचा पुरावा म्हणून (आयडेंटिटी) घेणार आहेत. ही सर्व माहिती संगणकामध्ये डाटाबेस करुन ठराविक दिवशी त्या व्यक्तिचे दहा बोटांचे फिंगरप्रिंट्स व डोळ्यातील आयरीसचा फोटो काढला जाईल. हे केल्यानंतर त्याला एक विशिष्ट बारा क्रमांकाचा `आधार क्रमांक` दिला जाईल.
प्रश्न : आधार प्रकल्प संपूर्ण देशात लागू होणार आहे का ? याचा उपयोग व महत्त्व काय आहे ?
उत्तर : संपूर्ण देशात आधार प्रकल्प लागू होणार आहे. संपूर्ण देशामध्ये आपला एक विशिष्ट क्रमांक राहील. आपण जर नंदुरबार जिल्ह्याचे रहिवाशी असू व दिल्लीला जाऊन आपल्याला बँक खाते उघडायचे असले तर आपण आपला `आधार क्रमांक` सांगितल्यावर आपली पूर्ण माहिती व आपली ओळख त्यांना प्राप्त होईल. तो सर्व भारतामध्ये वैध राहणार आहे. एकदा `आधार क्रमांक` मिळाल्यावर वेगळा पुरावा द्यावा लागणार नाही.
प्रश्न : `आधार क्रमांक` कसा मिळेल ?
उत्तर : `आधार क्रमांक` मिळविण्यासाठी नागरिकाला शासकीय प्रमाणीत २९ दाखल्यांपैकी किमान एक दाखला आपले ओळखपत्र, वास्तव्याचा दाखला, आधार केंद्रावर दाखवावा लागेल. तो नसेल तर त्या क्षेत्रातील निबंधकांनी नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचार्‍यांकडून ओळखपत्र शिफारस घ्यावी लागेल. आधार केंद्रात आलेल्या व्यक्तीचा फोटो काढून त्या अर्जात इत्यंभूत माहिती भरल्यानंतर बायोमेट्रीक पद्धतीने दोन्ही हाताचे ठसे घेऊन त्या व्यक्तीच्या दोन्ही डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॉनिंग करण्यात येईल. ही सर्व माहिती ऑनलाईन साठवून त्याआधारे संगणकाने निवडलेला एक १२ अंकी क्रमांक नागरिकांना देण्यात येईल. हा क्रमांक नागरिकांना पोष्टाने पाठविण्यात येईल. महाराष्ट्राच्या दृष्टीने गौरवाची बाब म्हणजे देशभरात राबविण्यात येणार्‍या आधाराची सुरुवात मा. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील टेंभी या छोटय़ाशा गावातून झाला आहे.
प्रश्न : पॅनकार्ड, रेशनकार्ड असल्यास आधार क्रमांकाची गरज आहे का ?
उत्तर : आपल्या समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांच्याकडे ओळख पटविण्यासाठी काहीच नसते. आपल्याकडे जे रेशनकार्ड आहे ते खरे आहे का हे पटविण्यासाठी पुरावा द्यावा लागतो. परंतु, आधार क्रमांकामध्ये सर्व माहिती असल्यामुळे (फिंगरप्रिंट, आयरीश स्कॅन ) ही व्यक्ती तीच आहे हे कळते म्हणून आधार क्रमांकाची गरज आहे.

Current Affairs || October 2018 ||

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी गीता  गोपीनाथ यांची निवड भारतीय वंशाच्या  गीता गोपीनाथ यांची नियुक्ती  आंतरराष्ट्रीय ना...