Saturday, 23 August 2014

Linus Torvalds : ऑपरेटींग सिस्टीम जगतामधील मवाळ क्रांतिकारक…!

Linus Torvalds : ऑपरेटींग सिस्टीम जगतामधील मवाळ क्रांतिकारक…!
लायनस टोर्व्हॅल्ड्स, असा जो याचा प्रचलीत उच्चार आहे तसा तो नाहीयं; तर लिनस तोरवाल्ड्स असा आहे. कंप्युटर म्हणजे विंडोज. म्हणजे त्यावर तेच असते, दुसरे काही असूच शकत नाही हे सर्वसामान्य युझरचे ज्ञान. थोड्याफार शिकलेल्या विद्यार्थ्यासाठी मॅक ओ.एस.सुद्धा विंडोज सारखच काहीतर प्रकरण आहे, ते ठरावीक मशीनवर चालतं आणि अमेरीकेत वापरतात इतकचं तोडक ज्ञान. हे दोनही वगळून उरले ते नवशिके प्रोग्रॅमर आणि त्यांच्या आजूबाजूला अपवाद वगळता “आठशे खिडक्या नउशे दार” या गाण्याप्रमाणे विंडोजच पहायला मिळायची. त्यामुळे इंजीनीअरींग व डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना gcc हा कमांड फक्त imported पुस्तकाच्या झेरॉक्स कॉपी मध्ये दिसायचा व प्रोग्रॅमिंग टर्बो सी मध्येच चालायचे व अजुनही चालते आहे. युनिक्स आणी लिनक्स हे डॆस्क्टॉप वर नसतात ही सुद्धा एक धारणा. त्यातुनही उरलेले ज्याना लिनक्स-युनिक्स माहीत आहे ते सर्व परदेशात. हि सर्व अवस्था फार पुर्वी नाही तर फक्त १०-१५ वर्षापुर्वीची. विंडोज ची हि मक्तेदारी खऱ्या अर्थान मोडीत काढायला सुरवात केली ती लिनसनं. आपल्याकडे अल्पसंख्यांकांच राजकारण केलं जातं पण फिनलंड मधील अल्पसंख्यांक जमातीत १९६९ साली जन्माला आलेला हा अवलीया अमेरीकेमध्ये स्थलांतरीत होउन थेट बिल गेट्स व मायक्रोसॉफ्टच्या मक्तेदारी व डिजीटल भांडवलशाही साम्राज्याला भिडला. म्हणून मी क्रांतीकारक असा शब्द वापरला…! आई व वडील दोघ सुद्धा पुरोगामी व उच्च-शिक्षीत. पण लिनस लहान असतांनाच आई-वडील वेगळे झाले व लिनस आईकडॆ वाढला. आजोबा प्रोफेसर असल्यामुळे पुढील शिक्षण सुरू झाले. सुखवस्तू असल्यामुळे ११ व्या वर्षीच घरी कंप्युटरचे आगमन झाले व बेसीक लॅंग्वेज शिकायला सुरवात केली. प्रोग्रॅमिंग व मॅथेमॅटीक्स चे जबरदस्त वेड. इतक की आजोबानी या तुन बाहेर पडावा म्हणून त्याला खेळाची सवय लावायचा प्रयत्न केला. तो प्रयोग फसला. सोशल होण्यासाठी प्रयत्न केले. ते सुद्धा फसले. शेवटचा उपाय म्हणून मैत्रीणीचा नाद लावायचा मार्ग सुद्धा अवलंबवला. पण या अवलियाने त्याला दाद दिली नाही. पैसे साठवून वयाच्या १७व्या वर्षी नवीन 128KB (MB अथवा GB नव्हे) RAM असलेले अद्यावत मशीन खरेदी केले…! १८ व्या वर्षी हेलसींकी विद्यापीठामध्ये प्रवेश घेउन लगेच C programming language च्या प्रेमात पडला व ३ वर्षाच्या कठोर परीश्रमानंतर ठरवले की ऑपरेटींग सिस्टीम लिहायची तर C language वापरायची. १९९१ साली त्याने IBM मशीन विकत घेतले. ४ MB RAM. पण यावर असलेल्या MS-DOS ला तो वैतागला होता. म्हणून युनिक्स install करायची होती कारण त्याच्या कॉलेज मध्ये युनिक्स होती. पण युनिक्स प्रचंड महाग होती. त्या काळात जवळपास ५००० डॉलर…! म्हणून ती कल्पना त्याला सोडून द्यावी लागली. व त्याने त्याच्यासारखीच पण कमी क्षमतेची टॅननबॉन ने तयार केलेल्या मिनीक्स या ऑपरेटींग सिस्टीमचा विचार केला. युनिक्स शिकवण्यासाठी टॅननबॉन मिनीक्सचा वापर करायचा. पण त्यामध्ये खुप कमतरता होत्या. म्हणून लिनस ने तीचाही नाद सोडून दिला आणी युनिक्स व मिनीक्स प्रमाणेच स्वत:च ऑपरेटींग सिस्टीम लिहीण्याचा विचार त्याचा मनात सुरू झाला. पण त्या मधील अडचणी, धोके व कॉलेजची वाया जाणारी वर्षे याची त्याला पुर्णपणे जाणीव होती. फिनलंड मध्ये त्या काळी शिक्षण मोफत असायचे व डिग्री ४ वर्षातच पुर्ण केली पाहीजे असा नियम नव्हता. म्हणून त्याने सरळ ब्रेक घेतला. मंध्यंतरी आर्मी मध्ये एक वर्षे काम करून आला कारण तिकडॆ ती अनिवार्य प्रथा होती. १९९१ च्या आसपास मात्र त्याने ऑपरेटींग सिस्टीम वर काम करायला सुरवात केली. त्यासाठी त्याने मिनीक्स वापरणाऱ्या युझर्स कडून नवीन पण फुकट देण्याची वचन देणाऱ्या ऑपरेटींग सिस्टीम पासून कोणत्या प्रकारच्या अपेक्षा आहेत हे मागवून घेतले. हे काम जिकरीचे व धाडसाचे होते. म्हणून त्याने काही काळ स्वत:ला एकट्याला कोंडून घेतले व बेसीक व्हर्जन तयार केले. अर्थातच सर्व कोड स्क्रॅच पासून लिहीण्यासाठी त्याने C language चा वापर केला. त्याला त्याने bash shell असे नाव दिले. व बेधडक पणे सर्व सोर्स कोड पब्लीक युझ साठी ftp सर्व्हर वर टाकून दिला. व प्रतिक्रीया मागवल्या. नेटवर्क वर टाकण्यासाठी त्याच्याच एका मित्राने त्याला मोलाची मदत केली.
free-soft लिनस ने या ऑपरेटींग सिस्टीम ला लिनक्स असे नाव देउन टाकायचा विचार केला. पण स्वत:च्या नावाचा आपण स्वत:च डांगोरा पिटत आहोत अशी भावना निर्माण झाल्याने त्याने नाव Freax असे ठेवले जे Free, freak आणी Minix पासून तयार केले होते. पण ज्या मित्राने ftp server वर लिनस चा सोर्स कोड टाकला होता त्या फोल्डर ला नाव लिनक्स ठेवले होते. शेवटी तेच राहीले… Richard Stallman
Richard Stallman नंतर रिचर्ड स्टॉलमन या पेशाने वकील असणाऱ्या व त्याच्या फ्री लायसेंन्स प्रमोट करणाऱ्या GPL under त्याने लिनक्स ऑपरेटींग सिस्टीम रिलीज केली. त्याने युझर्सना अभ्यास करायची, डाउनलोड करायची, मॉडीफाय करायची, एक्सटेंड करायची व प्रसार करण्याची सवलत देउन टाकली. असं फुकट काहीतरी मिळतय असे कळाल्यानंतर लोकांच्या त्यावर उड्या पडल्या तर नवल नव्हतच व लिनक्स चा प्रसार सुरू झाला. linux-20-años पाच वर्षात म्हणजे १९९७ पर्यंत ७० लाख installation झाली. अर्थातच प्रसिद्धीला शत्रू लगेच होतात तसे लिनस च्या बाबतीत सुद्धा झाले व टॅननबॉनच्या टिकेला सामोरे जावे लागले. कारण लिनक्स फ्री असल्या मुळे टॅननबॉन सैरभैर झाला. linux-vs-vista_1024x768 १९९७ मध्ये मात्र लिनस ने त्याचा मुक्काम फिनलंड मधून सिलीकॉन व्हॅलीमध्ये हालवला आणि ट्रांसमेटा या कंपनीमध्ये रुजू झाला. अर्थातच नोकरी करता करता लिनक्स वरचे काम चालू ठेवणार अशी त्याने अट घातली होती व कंपनीने ती मान्य केली. सिलीकॉन व्हॅली मध्ये अर्थातच लिनस ची तुलना थेट बिल गेट्स बरोबर सुरू झाली. दोघे सुद्धा प्रोग्रॅमर. दोघांना सुद्धा चश्मा… दोघांची उंची एकच इतकेच काय ते साम्य. एक डिजीटल क्षेत्रामधीलअनभिक्षत साम्राज्यवादी तर दुसरा फ्री देणारा गरीब नोकरदार अशी टक्कर सुरू झाली.
१९९९ मध्ये मात्र त्याच्या १५ वर्षाच्या कष्टाला फळ मिळाले व रेड हॅट ने लिनक्स डिस्ट्रिब्युट करायला सुरवात केली व लिनक्स करोडपती झाला. त्या नंतर मात्र त्याने मागे वळून पाहीले नाही कारण नंतर Oracle, Intel, Corel या दिग्गज कंपन्यानी त्यांच्या हार्डवेअर वर लिनक्स पोर्ट करायला सुरवात केली. अर्थात इतके सर्व असूनही लोकांना ती फुकटच मिळत होती व अजूनही फुकट मिळते. या सर्व घडामोडी होत असतांना, अब्जाधीश होण्याच्या अनेक संधी दारात असतांना सुद्धा लिनसने त्याच्या “आयुष्य हे आनंदाने जगण्यासाठी असते, अब्जाधीश होण्याकरीता नसते” या तत्वाला सोडले नाही. पण सध्या सुद्धा हा ४६ वर्षाचा उमदा तरूण Oregon मध्ये OSDL म्हणजेच Open Source Development Lab मध्ये काम करत असला तरी त्याला अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळण्यापासून अलिप्त ठेउ शकला नाही. त्याची लिस्टची छोटी झलकच पहा येथे IEEE चा या वर्षीचा पायोनीयर पुरस्कार, २०१२ साली इंटरनेट हॉल ऑफ फेम २०१२ मध्ये नोबेलच्या दर्जाचा मेलिनीयम टेक्नॉलॉजी पुरस्कार २००० साली टाइम मॅगेझीनचा “शतकातील १०० महत्वाच्या व्यक्तीं” च्या यादीत १७ वा क्रमांक २००२ साली पुन्हा टाइमचा जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत नाव २००६ साली गेल्या ६० वर्षातील क्रांतीकारीक हिरो…व असे अनेक पुरस्कार मिळाले. १९९६ साली तर लघुग्रह शोधणाऱ्या शास्त्रज्ञाने त्या लगुग्रहाला लिनस असे नाव दिले कारण शास्त्रज्ञच लिनक्स ऑपरेटींग सिस्टीम ने प्रभावीत झाला होता. लिनसच्या नावावर तर ३५ वेगवेगळी पेटंट्स उपलब्ध आहेत. linus-torvalds-by-glenn1794-d4xkv55-644x320 क्रॅश होणाऱ्या ऑपरेटींग सिस्टीम तयार करून अब्जाधीश व्हायचे, साम्राज्य तयार करायचे, अनेक कंपन्या घशात घालायच्या व मक्तेदारी शाबूत ठेवायची या प्रचलीत व तथाकथित न्याय्य पद्धतीला आव्हान देउन ऑपरेटींग सिस्टीम तर चांगली तयार करायचीच पण जगाच्या कल्याणाकरीता. विकायची नाही. श्रीमंत व्हायचे नाही. फुकट द्यायची. हे लिनसचे तत्व इतके प्रसिद्ध झाले की लिनस चा नियम (Linus’s Law) म्हणून मान्यता मिळाली. हा लॉ काय सांगतो की “Given enough eyeballs, all bugs are shallow”… ऑपरेटींग सिस्टीममध्ये खुप आत दडलेला बग एका प्रोग्रॅमरला सापडत नाही… पण बग सापडण्यासाठी सगळ्याना कामाला लावले तर बग शिल्लकच रहात नाही… म्हणुनच त्याने लिनक्स सर्वांसाठी फ्री उपलब्ध करून ठेवली…!
तुमच्या प्रतिक्रिया आमहाला जरूर कळवा.................................नजरचुकीने किवा डी.टी.पी करतान साह्यकाकडून चूक होऊ शकते .चुका निर्दष्ण्य्त आणून दिल्यास आपले स्वागत आहे. आपला नागसेन सुरवाडे (ब्लोग आडमिनीस्टेटर ) संदर्भ : C मराठी ब्लोग

No comments:

Post a Comment

Thanks For Visit Us

Current Affairs || October 2018 ||

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी गीता  गोपीनाथ यांची निवड भारतीय वंशाच्या  गीता गोपीनाथ यांची नियुक्ती  आंतरराष्ट्रीय ना...