Wednesday, 30 December 2015

आठ सिक्रेट्स २०१६ साठी नेहमी प्रमाणे या वेळेसही नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही खास मुद्दे आपल्यासाठी सादर करत आहे व ते म्हणजे ८ सिक्रेट्स. वर्ष २०१६ चा सफर समाधानकारक आणि फलदाई बनविण्यासाठी. शिक्षण असो, नौकरी किंवा व्यवासाय प्रत्येक क्षेत्रात याची प्रेरणा आणि प्रेरणेमुळे आलेला बदल अनुभवायला मिळेल. तर मग बघुयात ८ प्रभावी सिक्रेट्स.१] अडचणींमधील अडचण म्हणजे “चालढकल”निर्णय घेण्याचे बोल्डनेस संपले कीसुरु होते ती चालढकल. बघा ना, हे करू – ते करू म्हणत २०१५ सरले. ‘एखादी ठरवलेली गोष्ट झाली नाही तर कसं होईल’ याची भीती खरं तर होणार्या परीणामांपेक्षाही भयंकर असते. २०१६मधे २०१५ पेक्षा जास्त बोल्डनेस हवेच. अहो, आपण App अपडेट करतो मग स्वतःचे गट्स का नाही. विकासाचा विसर पडला कि चालढकल वाढते आणि वर्षसरते. मग आता निवड तुमचीच. चालढकल करून आपण फक्त जोखीम टाळतो, अपयश नाही.२] तुमच्यातील ओरीजण्यालीटीच तुम्हाला टिकवेलकॉपी-पेस्ट च्या नादात आणि सो कॉल्डस्पर्धेच्या फंद्यात जो तो – ते करण्याचा प्रयत्न करतोय जे त्याचे स्वतःचे नाही. आपण सर्व वैशिष्ट्यपूर्ण आहोत, एकमेकांची कार्बन कॉपी नाही. व्यवसाय असो किंवा नौकरी – नाविन्यता, कल्पकता आणि वेगळेपण दिले तरच तुमचा क्रेझ राहणार आहे आणि हे तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा तुम्ही ओरिजिनल राहाल. कॉपी-पेस्टच्या मायाजालात शिक्षित आणि विद्वान असे गुरुफटलीत कि स्वतःचे इंस्टिंकट देखील विसरत आहेत. मार्केट डाऊन असो किंवा अप, तेजी असो का मंदी किंवा कसलेही संकटअसो फक्त एकच लक्षात असू द्या टूमॉरो नेव्हर डाइज, सो द ओरिजण्यालिटी. म्हणून २०१६ मधे cp म्हणजे कॉपी-पेस्ट नाहीत तर cp म्हणजेच क्रीएटीव्हीटी पर्सोनिफाईड वर भर द्या.३] रुटीन आणि एकरसता तोडादर वर्षी कितीतरी गोष्टी करायच्या राहून जातात आणि संकल्पांचा तर विषयच सोडा. कामा-कामात वेळच मिळत नाही, ना कोणता छंद पूर्ण होत नाही. वास्तविक पाहता आठवड्यातून एखादा दिवस रोजचे रुटीन मोडून काही वेगळे केले तर कामत फारसा काही फरक पडत नाही.पण तरीही, कामात आणि घड्याळीत गुरफटन्याची सवय जडली आहे……२०१६ मधे मात्र रुटीन ब्रेक कराच आणि द्या त्या इच्छेला वाव ज्या अपूर्ण आहेत….. माणसाला कोनतानाकोनता छंद असावा आणि त्या करता वेळ ठेवावा कारण एक छंद कित्येक आजारांचे निवारण करतो4]वर्तमानाला प्राथमिकता द्यावर्तमानालाच फोकस करणे आणि वर्तमानालाच प्राथमिकता देणे हे जास्त महत्वाचे कारण आपण जेंव्हा गेलेल्या काळाबद्दल दुख्ख आणि भविष्याबद्दल चिंता करत बसलोत तर वर्तमान हरवून बसतो. वर्तमानात कोणीच राहात नाही. वर्तमानावरच लक्ष केंद्रित केल्याने काही काळासाठी त्याला भूतकाळातील अपयश किंवा भविष्यातील आव्हानांचा, अडचणींचा विसर पडतो. या तणावविरहित परिस्थितीमुळे सकारात्मक दृष्टिकोन वाढीला लागून मनुष्याच्या कार्यक्षमतेत किंवा शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास प्रॉडक्टिव्हीटीत (उत्पादनक्षमतेत) भर पडते व हे माझ्या अभ्यास आणि संशोधनाअंती आढळून आले आहे. वर्तमानाची काळजी घेतली की भविष्यकाळ सुदृढ होतोच. २०१६ मधे प्राथमिकता वर्तमानालाच.५] तुमची कृती ठरवते प्रभाव, प्रतिबिंब आणि प्रतिफलकाही तक्रारी मी नेहमी ऐकतो – १) मला नेहमी अशेच लोक भेटतात २)जो तो माझेच नुकसान लावतो, ३] माझं नशीबच फुटकं आहे. इ. पण या सर्व प्रतिक्रिया कृतींवर आधारित आहेत आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब व त्यापासून निर्माण होणारी परिस्थिती ही तुमच्या कृतीवरूनच ठरते. वर्षांमागून वर्षेजातात, पण आपल्या वागण्या बोलण्यात फारशे बदल होत नाहीत, परिणामी आपल्या अनुभवात तेच येतं जे आधी आलेहोते. तुमची कृती मग ती वैचारिक असो किंवा शारेरिक नेहमी एक विशिष्ट तरंग निर्माण करत असते. तरंग जितके सकारात्मक तितके त्याचे रिफ्लेक्शन (परिणाम / प्रतिफळ) चांगले आणि तरंग जितके नकारात्मक तितकेच वाईट…६] पेंडिंग कामांची संख्या म्हणजेच सफलतेचा आलेखकाय म्हणता? मागच्या वर्षी बर्याच गोष्टी राहिल्या आणि खूप कामे बाकी आहेत, अहो मग तुमच्या पेंडिंग कामांची संख्याच तुमच्या सफलतेचा / असफलतेचा आलेख आहे. जर मागचीच लिस्टक्लीअर झाली नाही तर मग पुढे काय ? आता ठरवा पण ते पूर्ण करण्याच्या नियोजानानेच आणि त्या करिता बोल्ड व्हावे लागेल, जोखीम घ्यावी लागेल, रुटीन तोडावे लागेल, वर्तमानाला प्राधान्य द्यावेच लागेल आणि हो कृतीशील व्हावेच लागेल आणि हे सगळे असेल तर मागील वर्षा पेक्षा जास्त गतीने आणि तीव्रतेने करावे लागेल. काळ गतिशील आहे, आपण स्लो राहून कसं चालेल.७] वास्तविक आणि प्रायोगिकविशेष यश आणि मोठी उंची गाठायची आहेतर मग तुम्हाला भावना आणि भावुकतेच्या धुक्यातून बाहेर यावेच लागेल. ध्येय साध करायचे असतील तर आजच्या कृतींमध्ये कालचे अनुभव जोडूनच इच्छित गोष्टी मिळवाव्या लागतील. भावना नैसर्गिक आहेत, पण भावनांच्या प्रभावात वास्तविकता दुर्लक्षित होते आणि मगमनाला वाटेल त्या पद्धीतीने नाते आणि व्यवहार जोपासले जातात आणि हाती लागते ते दुक्ख आणि निराशा. दर वर्षी हेच हवे का ? आणि नको तर थोडं वास्तविक बना म्हणजेच बी प्रॅक्टिकल. कॉर्पोरेट जग खरचं निष्ठुर असतं, इथे कोणालाही तुमची दया येत नसते आणि तुमीही अपेक्षा करू नका. तुमच्या विचार आणि कृतींना वस्तुस्थितीची जोड नसेल तरहेतू किंवा प्रोजेक्ट कितीही चांगला असला तरी पदरी निराशाच येईल.२०१६ मध्ये बी मोर प्रॅक्टिकल८] रियालिटी फास्टरियालिटी फास्ट म्हणजे एक प्रकारच उपवास जो तुम्हाला उत्कृष्ठता, उन्नती आणि उंची देईल. या २०१६ मध्ये तुम्हाला इतकेच करायचं कि एक उपास धारायचाय त्यात तुम्ही सगळे खा पण, कमीत कमी २४ घंटे प्रतिक्रिया देणे टाळा, चुका दाखवणे, दोष आणि टीका करणे टाळा, पूर्वगृह करणे टाळा, कारणे देणे टाळा, नकारात्मक दृष्टीकोन टाळा, अपेक्षा करणे आणि इतरांना गृहीत धरणे टाळा….. बघा नात्यांमध्ये, नौकरी मध्ये आणि व्यवसायामध्ये कायजादू होते ते.हे खूप कठीण नाही, पण हो एक स्वतःवरील नियंत्रणाचा भाग नक्कीच आहे आणि या गोष्टी टाळल्या तार तुमची लायाकिंग प्रचंड प्रमाणात वाढेल…मित्रांनो वर्षाचा शेवट म्हणजे काही मार्च एंड ची auditing नसते जिथे आपला नफा आणि तोटा यांचा हिशोब केलाजातो. वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरवात हा एक अतूट भाग असतोजो भविष्य जोडणीला मदत करतो.

Current Affairs || October 2018 ||

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी गीता  गोपीनाथ यांची निवड भारतीय वंशाच्या  गीता गोपीनाथ यांची नियुक्ती  आंतरराष्ट्रीय ना...