Wednesday, 26 August 2015

MPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो?
जीवनात सोपं असं काही नसते. काही मिळवायचे असेल तर त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.

MPSC राज्यसेवा परीक्षा सुद्धा म्हणावी तशी सोपी नाहीये. तर मग ह्या परीक्षेत सफल व्हायला काय करावं लागणार आहे?

सर्वात प्रथम तुमच धेय्य निश्चित करा, ते पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत कोणत्या स्वरुपाची असायला पाहिजे हे मी सांगेन, ठीक आहे तर मग?

सर्वात आधी हे नक्की करा की तुम्ही जो अभ्यास करत आहे तेच तुम्हाला व्हायचं आहे का?

स्वप्न पाहण खूप सोपं आहे पण ते सिद्ध/पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत व हिम्मत लागते आणि हे खूप कठीण काम आहे.⏳ दुसरे म्हणतात म्हणून MPSC च स्वप्न पाहण चुकीच आहे, तुमचं स्वतःचा  तो निर्णय असावा लागतो.कारण त्यासाठी लागणारी मेहनत तुम्हालाच करावी  लागणार असते. तुम्ही स्वतःच निर्णय घ्या, तुमची लायकी काय आहे हे तुमच्याशिवाय कोण जाणू शकतं?

तुम्ही स्वत बघा की अश्या परीक्षेसाठी लागणारी मेहनत तुमच्या अंगी आहे का? तुमच्याजवळ तो सेल्फ-कोन्फिडेंस म्हणजेच आत्मविश्वास आहे का? सतत लागणारी दृढ इच्छाशक्ती आहे का?
जर वरीलपैकी काही नसेल तर मग असा व्यक्ती असफल्तेन व्याकूळ होतो आणि मग निराशेच्या अंधारात बुडून जातो.
पण जर तुमचा निर्णय तुमच्या मेहनती, आत्मविश्वासानं, दृढ इच्छाशक्तीन घेतलेला आहे अत्र मग निश्चिंत पुढे जा.
सुयोग्य स्टडी मटेरियल निवडा आणि अभ्यासाला लागा. तुमची एनर्जी इकडे तिकडे वाया ना घालवता अभ्यासात घाला.
राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास व्यापक/विस्तीर्ण (Wide Extensive ) व  मोजकाच (Selective Intensive) असावा. पूर्व परीक्षेसाठी विस्तीर्ण स्वरूपाचा करावा व मुख्य परीक्षेसाठी सिलेक्तीव स्वरूपाचा करावा.

पार्ट-II उद्या बघू…

       

     आपला
नागसेन सुरवाडे.

Current Affairs || October 2018 ||

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी गीता  गोपीनाथ यांची निवड भारतीय वंशाच्या  गीता गोपीनाथ यांची नियुक्ती  आंतरराष्ट्रीय ना...